जाहीर सूचना :आज उद्या चंद्रपुरचा पाणी पुरवठा बंद ! : मनपाचे आवाहन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना :आज उद्या चंद्रपुरचा पाणी पुरवठा बंद ! : मनपाचे आवाहन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जाहीर सूचना - तुकुम जलशुद्धीकरण केंद्राजवळ ईरई धरणावरुन येणारी पाईप लाईन जाेडणीचे काम सुरु असल्याने बुधवार २९ जानेवारी रोजी चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. पाईप लाईन जाेडणीचे काम मंगळवार पासूनच सुरु असल्याने मंगळवार २८ जानेवारी व बुधवार २९ जानेवारी अश्या दोन्ही दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर पाईप लाईनची लवकरात लवकर जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा कर्मचारी कार्यरत असून शहरातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे व सहकार्य करण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.