मुद्रा बँकेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी चंद्रपूर जिल्हयात करणार प्रचार, प्रसार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुद्रा बँकेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी चंद्रपूर जिल्हयात करणार प्रचार, प्रसार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून नावारुपास आलेली असलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला 30जानेवारी 2019 ला  सुरुवात करण्यात आली.

नियोजन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सहभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला सुरुवात करण्यात आली. हा चित्ररथ जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये फिरणार असून याद्वारे ग्रामिण भागात कर्जा विषयीची माहिती आणि पत्रके दिली जातील.आणि या सोबतच या कर्जाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात यश मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा या चित्रफीतीव्दारे दाखविली जाईल.

जिल्हयात एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 37898 लाभार्थांनी 199.65 कोटी कर्ज घेतले आहेत. तर ही योजना सुरू झाल्यापासून किल्ल्यामध्ये आत्तापर्यंत 600 कोटी रुपयांच्या वरती कर्जाचे वाटप झाले आहे. यातून अनेकांनी हा उद्योग व्यवसाय उभारले असून भरभराटीला प्रारंभ झाला आहे. या योजनेच्या मार्फत 10 हजार ते 10 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. उद्योग व्यवसायामध्ये अभिरुचि असणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी  या योजनेला प्रसिद्धीची जोड देण्यात येत आहे.जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ.विजयता सोळंकी तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कौशल्य विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांच्या उपस्थितीत आज या चित्ररथाला हीरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते जिल्हास्तरीय मुद्रा बँक समितीमार्फत या प्रचार प्रसिद्धीचे आयोजन करण्यात आले आहे.