हिंदुहृदयसम्राट सन्मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती औचित्याने शेकडो महिलांचा शिवसेनेत भव्य प्रवेश : शिवसेनेच्या समाजकार्याचा प्रचार व प्रसार करण्याचा चंद्रपुरातील महिलांचा संकल्प #balasahebthackeray - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिंदुहृदयसम्राट सन्मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती औचित्याने शेकडो महिलांचा शिवसेनेत भव्य प्रवेश : शिवसेनेच्या समाजकार्याचा प्रचार व प्रसार करण्याचा चंद्रपुरातील महिलांचा संकल्प #balasahebthackeray

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य शिवसेना चंद्रपूर तर्फे शिवसेना जनसंपर्क कार्यालय, बंगाली कॅम्प,  मूल रोड चंद्रपूर येथे रक्तदान व आरोग्य शिबीर तसेच महिलांचा भव्य पक्षप्रवेश व हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. 

श्री मनोज भाऊ पाल यांच्या मार्गदर्शनात, सौ. मायाताई पटले, महिला उपजिल्हा संघटिका यांच्या नेतृत्वात श्री. आकाश साखरकर (माजी नगरसेवक ) कु. गोमती पाचभाई, पंकजसिंग दीक्षित, संजय शहा, माधव पॉल,  यांच्या आयोजनात चंद्रपूर शहरातील शेकडो महिलांना सन्मा.बाळासाहेब ठाकरे संस्थापीत  शिवसेनेच्या समाजसेवा-राजकारणाच्या दुरदुर्ष्टीचा परिचय देण्यात आला.

सन्माननीय मुखमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊनचंद्रपूर शहरातील शेकडो महिलांनी सन्मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून    चामाटे ताई, उर्मिला बिसेन स्वेता भोयर, सविता पिदूरकर, हर्षा सायंकार, आरती तुरिले, शिल्पा पडोळे, सुनीता जयस्वाल, भूमिका मेश्राम, रीना जयस्वाल, सुनीता डांगरे, कविता लांडे, सुलोचना मेश्राम, संगीता किन्नाके, आम्रपाली खोब्रागडे, रंजना दाते, सविता मेश्राम, विमल दुबे, माया खडसंगे, आशा खडसंगे, दुर्गा पराते, झुलनबाई चौधरी, निर्मला पटले, शारदा तडस, रंजनी अगंडवार, नीता चिट्टे, अर्चना घुगरे, वर्षा खोब्रागडे, कलावती बोपचे, नंदा राऊत, सुषमा ठवरे, मंगला वानखेडे, अंजु येलमुळे, लता तावडे, साधना वाढई, जया गेडाम पपीता चौधरी, मंदा किटते, पुष्पा वानखेडे, नीता वानखेडे सुनीता परचाके, नंदा चौधरी, कौशल्या आस्वले, कुसुम बुटले, विमल दहाते, कल्पना नरांजे, सविता बोमनवार, पौर्णिमा शंभरकर, माधुरी जाधव, सविता बोभाटे, शिला नैताम, मीना वाढांकर, सरस्वती वाघाडे, सुरेखा वाघाडे अश्विनी चौधरी यांच्या समेत शेकडो महिलांनी  शिवसेना पक्षप्रवेश घेऊन  सन्माननीय बळहेबांच्या समाजसेवेच्या व्रताचा स्वीकार करत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला.