मंदिरांमध्ये दर्शनाच्या नावाखाली होत असलेली लुटमार व स्री-सुरक्षा : मंदिरांमध्ये दर्शनाच्या नावाखाली होत असलेली लुटमार -आदित्य आवारी यांच्या अनुभवातून #aditya - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मंदिरांमध्ये दर्शनाच्या नावाखाली होत असलेली लुटमार व स्री-सुरक्षा : मंदिरांमध्ये दर्शनाच्या नावाखाली होत असलेली लुटमार -आदित्य आवारी यांच्या अनुभवातून #aditya

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :(आदित्य आवारी यांच्या अनुभवातून )गेल्या ११ जाने. ते १७ जानेवारी २०२० या कालावधीत मी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर संतांचा वारसा आलाच परंतु संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज इ. संतांनी समाजाला अंधारातून प्रकाश झोतात आणण्याचे समाजकार्य केले,त्या काळात साहित्य निर्मिती करून काव्य,ओव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले,परंतु एकविसाव्या शतकातील मंदिरांची परिस्थिती बघता देव दर्शनाच्या नावाखाली भक्तांची लुट होतांना मी या सात दिवसात डोळ्याने प्रत्यक्ष बघितले,मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी लोकांसाठी वेगळ्या रांगा दिसल्या व त्या रांगेत उभं राहण्यासाठी हजारो रुपये भक्त देत होते. अभिषेकाच्या नावाखाली हजारो-लाखो रुपयांची उलाढाल होतांना दिसली. 

देवदर्शन करते वेळी भक्तांनी हा देव खरंच अस्तित्वात होता काय? याचा विचारही कधी केला नसवा. काही मंदिरात तर चक्क एका दिवसात लाखो रुपयांची देणगी जमा होत होती परंतु त्या मंदिरांच्या पायऱ्यांवर बसलेली,समाजाने दूर सारलेली वृध्द माणसे मात्र थंडीने ताटकळत निजलेली होती. मंदिरातील निर्जीव दगडांनी जर समाजातील लोकांच्या हिताचा विचार करून ते देव झाले असतील तर मग एखादा चमत्कार ते बाहेर बसलेल्या वृध्दांवर का करीत नाही? याचाही विचार भक्तांनी करायला हवा. भक्तांची लुट करुन एखाद्या मंदिराची संस्था मंदिरेच उभारताना दिसते आहे परंतु शाळा,वाचनालये उभारणारी मंदिर संस्था उदयास आली नाही व येणारही नाही हे अंतिम सत्य आहे. 

मंदिरात मांडलेल्या दगडाला डोक जरी आदळले तरी भक्त यशस्वी होऊ शकणार नाही कारण शेवटी जो व्यक्ती प्रयत्न करतो तोच यशाची शिखरे गाठू शकतो. हेही भक्तांनी लक्षात घ्यायला हवेत! भक्त मंदीरात जे पैसे दान करतात त्या पैशातून फक्त पुजारी जगत असतात.मंदिरात जाऊन यज्ञ करण्यापेक्षा समाजातला अंधकार जर भक्तांनी दूर केला तर निश्चितच येणार्‍या पिढ्या शिक्षित बनतील अन्यथा देवांचे नामस्मरण व मंदिरांमध्ये लाखो रुपये दान करुन पुढील युवा पिढी खडतर शिखरे गाठण्यात अयशस्वी होतील हेही तितकंच सत्य आहे.

माझ्या युवा मित्रांना मी एक समवयस्कर मित्र म्हणून एवढाच संदेश देऊ इच्छितो की,देवग्रंथ वाचण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे साहित्य वाचा,समाजकार्य करण्याची गोडी निर्माण करणारे पुस्तके वाचा,आयुष्यात एका तरी यशस्वी व्यक्तीचा आदर्श ठेवा! तरच आपण येत्या काळात क्रांती घडवू शकू अन्यथा आपण आपले ज्ञानाने भरलेले माथे गहाण ठेवलेले असु....!

स्री सुरक्षा-सावित्रीबाई फुलेंनी स्रीला शिक्षणाचे धडे दिले व माणसांप्रमाणेच स्रीयांना देखील त्याच पातळीवर आणुन ठेवले परंतु स्री देखील मंदिरातील दगडांची गुलाम झालीय.अशा वेळी स्री दर्शनासाठी रांगेत उभी असता तिला ढकला-ढुकलीचे व समाजाला काळीमा फासणारी अनेक घटना घडल्यात परंतु कित्येक मंदिर संस्थेने अशा घटनांकडे दूर्लक्ष केले,मंदिरांमध्ये स्रीला सुरक्षा मिळत नसल्याने तिला अनेक वागणुकीला सहन करावे लागते.मंदीरातला देव ज्या ठिकाणी मांडलेला असतो अशा ठिकाणी तर निर्वस्त्र लोक (अर्थात भक्त त्यांना पुजारी संबोधतात.) बसलेले असतात अशा वेळी देखील स्रीचा अपमान होतांना दिसतो.


❀मी हा लेख अनुभवातून व डोळ्याने बघितलेल्या कृत्यातून लिहीलेला आहे.या लेखाचा अनेक लोक विरोधही करतील हेही मला आधीच माहिती आहे परंतु हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच की,माझे युवा मित्र उद्याचे या देशाचे भावी भविष्य आहे व या लेखातून किमान दहा युवकांची भरकटलेली माथी मुख्य प्रवाहात आली तर माझ्या लेखाचे सार्थक होईल.
धन्यवाद...!-आदित्य आवारी, राजुरा ( adityaawari47@gmail.com)