9वर्षीय मुलाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत : मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

9वर्षीय मुलाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत : मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात #gondpipari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर 
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धामणगाव येथिल तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या उज्वल गेमाजी खेडेकर या  मुलाचा गळा आवळून हत्या करण्यात आली. या घटनेने तालूक्यात खळबळ उडाली होती.  या धक्कादायक घटनेच्या तपासाला अधिक गती आली. यासाठी श्वानपथकाला देखिल पाचारण करण्यात आले. यावेळी गावातीलच प्रविण सुरेश सुरकर या युवकाच्या घराच्या दिशेने श्वान वारंवार जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशी केली असता प्रविण घटनेनंतरच फरार आढळून आला. त्याला शोधासाठी चार पोलिस पथके रवाना करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान प्रविण सुरकर यांना महाराष्ट्र - तेलंगणाच्या सिमेवरिल नंदवर्धन गावातुन अटक करण्यात आली. यानंतर अधिक चौकशी केली असता प्रविण सुरेश सुरकर (२६) यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. आज (शुक्रवारी) गोंड़पिपरी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. 

आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी बालकाची हत्या त्या युवकाने का बरं केली याबाबत त्याने अधिक सांगणे टाकले. त्यामुळे धामणगाव उज्वल हत्या प्रकरणातील कारण अद्याप गुलदस्त्यात असून अधिक तपास सुरू आहे.