खबरकट्टा / चंद्रपूर :
जगभरात थैमान घातलेल्या आणि चीनमधे मृत्यूचे तांडव करणार्या कोरोना व्हायरसची भीती पसरली असुन नुकतेच पुणे मधिल एका युवतीला व्हायरसची झाल्याची बातमी विस्मरणात जाण्यापूर्वीच 7 विद्यार्थिनींना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची प्राथमिक माहिती येऊन धडकल्याने खळबळ माजली आहे. ह्या 7 विद्यार्थिनी पैकी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका मुलीचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरोना व्हायरसची उगमस्थान असलेल्या चीन मधिल हुआन शहरापासून जवळपास 90 किमी अंतरावर असलेल्या सीयानींग शहरात ह्या मुली वैद्यकीय शिक्षण घेत असुन त्यांना कोरोना व्हायरसचा झाल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
ह्या विद्यार्थिनी पैकी एक विद्यार्थिनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील असुन भाग्यश्री नावाच्या ह्या मुलीचे वडील निर्माणी कार्यरत असल्याचे कळते तर सेवानिवृत्त तहसीलदार यांची सोनाली नामक मुलगी गडचिरोलीची असल्याचे माहिती झाले आहे.
महाराष्ट्रातील इतर विद्यार्थिनी लातूर, पुणे, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील आहेत. ह्या सर्व विद्यार्थिनीहुआन शहरापासून 90 किलोमीटरवरील सीयानींग शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत हे विशेष.