स्कॉऊट-गाईड च्या माजी विध्यार्थीचे जिल्हा मेळाव्यानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न : - राजुरा येथे 6,7 व 8 फेब्रुवारी ला स्कॉऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्कॉऊट-गाईड च्या माजी विध्यार्थीचे जिल्हा मेळाव्यानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न : - राजुरा येथे 6,7 व 8 फेब्रुवारी ला स्कॉऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा (30 जानेवारी)-

चंद्रपुर भारत स्कॉऊटस आणि गाईडस जिल्हा संस्था ,चंद्रपुर द्वारा आयोजित दि.6, 7, व 8 फेब्रुवारी ला होणाऱ्या " स्कॉऊट-गाईड जिल्हा मेळावा" निमित्त मेळावा स्थळी राजुरा तालुक्यांतील माजी विध्यार्थी व शहरातील स्कॉऊट-गाईड यूनिट चे विध्यार्थी व त्यांच्या यूनिट लिडर शिक्षक -शिक्षिका यांनी " स्वच्छता अभियान " राबविले. व माजी विध्यार्थीनी आपले अनुभव व्यक्त करीत उपस्थित विध्यार्थीशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी यशवंत हजारे ,जिल्हा संघटक स्कॉऊट हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथि म्हणून प्राचार्य शांताराम उईके, कार्यक्रम प्रमुख ,किशोर उईके, मेळावा प्रमुख, प्रशांत खूसपूरे, स्काउटर प्रतिनिधि ,प्रकाश डाखोडे, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,माजी विध्यार्थी रोअर यूनिट योगेश लांडे ,श्रीकांत रोगे ,प्रमोद लांडे, रमेश इटनकर ,अरविंद लांडे, सुरेश कूडे , आदींची उपस्थिति होती.


यावेळी राजुरा शहरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन माजी विध्यार्थीच्या स्कॉऊट गाईड मधील अनुभव आणि कार्य जाणून घेतले. किशोर उईके यांनी जिल्हा मेळाव्यात होणाऱ्या विविध स्पर्धाविषयी माहिती देत राजुरा येथील 18 वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मेळाव्याचे अनुभव कथन केले. शांताराम उईके यांनी स्कॉऊट-गाईड च्या निर्मिती,कार्य व जिल्हा मेळाव्यातील तीन दिवसांच्या दैनंदिनी विषयी सविस्तरपणे माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात यशवंत हजारे यांनी जिल्हा मेळावा यशस्वी करण्याकरीता विध्यार्थी व शिक्षकांनी सहकार्य करून मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच या मेळाव्याकरीता नियोजनाचा आढावा घेतला. यानंतर सर्वांनी मिळून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे होणाऱ्या चंद्रपुर स्कॉऊट-गाईड मेळाव्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यांकरीता शिवाजी हायस्कूल च्या शिक्षिका वर्षा गीनगुले , योगीता शेडमाके ,महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे एल.टी.मडावि, एस.डी.निखाडे ,इन्फंट् जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल चे एस.टी.पिंपळकर ,मंजू नगराडे , श्रीमती गोपिकाबाई सांगडा आश्रमशाळाचे जे.डी.नंदरधने ,जिजामाता कन्या विद्यालयच्या ज्योती कुबडे ,आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या सुनीता कोरडे ,अर्चना मारोटकर ,रोशनी कांबले यांच्यासह विध्यार्थीनी मोठ्यासंख्येत सक्रिय सहभाग दर्शवून स्वच्छता  अभियान राबविले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्तावीक उप मेळावा प्रमुख स्कॉऊट बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन छ. शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट चे लिडर रुपेश चिड़े यांनी मानले.