खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -सामूहिक बलात्कार
देशभरात सध्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीची चर्चा सुरू असताना, तसेच अशा अत्याचारांबाबत जनजागृतीही सुरू असताना नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे उघड झाले आहे. बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.
या 12 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून 4 नराधम शिक्षकांनीच अत्याचार केला. मुलीची प्रकृती गंभीर आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे.
सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील व धनंजय शेळके अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी शाळेतील कर्मचारी सुरेखा बनसोडेवरही आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी फरार आहेत.