चंद्रपूर – तालुक्यातील वरवट या गावात मामाने आपल्या चिमुकल्या भाच्याच्या डोक्यावर काठीने प्रहार करीत ठार केल्याची धक्कादायक घटना 27 जानेवारीला सकाळी घडली आहे.
सविस्तर माहिती नुसार आज सकाळी 4 वर्षीय दीक्षांत दिनेश कावळे हा आपल्या घराच्या अंगणात बहिणीसोबत खेळत होता, त्यावेळी दीक्षांतचा मामा रघुनाथ गेडाम याने अचानकपणे काठी हातात घेत दीक्षांतच्या पायावर नंतर त्यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला, यामध्ये दीक्षांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान दीक्षांतचा मृत्यू झाला.
प्रत्यदर्शीनी आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी रघुला पकडून, त्याचे हात पाय जवळच असलेल्या खांबाला बांधून त्याला चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपी रघुनाथला अटक केली.रघुनाथने अचानक हा हल्ला का केला हे अजूनही गुदस्त्यात असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.