गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चा सुवर्ण महोत्सव : 23 जानेवारी पासून 4 दिवस भरगच्च कार्यक्रम #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चा सुवर्ण महोत्सव : 23 जानेवारी पासून 4 दिवस भरगच्च कार्यक्रम #gadchandur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : गडचांदूर -

2 ऑक्टोबर 1969 ला गडचांदूर येथे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती,  आज या संस्था ने 50 वर्षे पूर्ण केले असून ,त्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव चे आयोजन   23 जानेवारी पासून 26 जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे.या शिक्षण संस्था चे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, 12 विद्यार्थ्यां पासून सुरू झालेल्या या संस्थेत आज 4224 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. केजी ते युजी पर्यंत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.

सुवर्ण महोत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे.महोत्सव चे उदघाटन 23 जानेवारी ला दुपारी 12 वाजता महाराष्ट्र चे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री  ना,विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष. आमदार सुभाष भाऊ धोटे राहतील.तर मुख्य अतिथी म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर व गोंडवाना विद्यापीठ चे कुलगुरु डाँ.एन. सी.कल्याणकर राहतील.विशेष अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विठ्ठलराव धोटे व गोंडवाना विद्यापीठ चे परीक्षा संचालक डॉ. अनिल चिताडे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून संस्था चे उपाध्यक्ष शामसुंदर हिरादेवे व राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विठ्ठलराव थिपे,प्रसाद कळशिकर, विकास भोजेकर,रामचंद्र सोनपितरे, उज्वलाताई धोटे,पुष्पाताई हिरादेवे राहतील.

याप्रसंगी महात्मा गांधी विज्ञान  महाविद्यालयाच्या नूतन इमारती चे उद्घाटन तसेच यशोगाथा स्मरणिकेचे चे विमोचन उपस्थित माण्यवराच्या शुभ हस्ते होणार आहेत.24 जानेवारी ला सकाळी 11 वाजता जिल्हा स्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित केली आहेत, जिल्हा तिल नामवंत शाळेच्या चमू सहभागी होत आहेत.


25 जानेवारी ला सकाळी 9,30 वाजता सप्तखणजेरिवादक ह.भ.प.दीपक भांडेकर महाराज(वर्धा)यांचा विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम होईल.11 वाजता चमकते सितारे, (माजी विद्यार्थी)सत्कार समारंभ होईल.4 वाजता बक्षीस वितरण प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये आमदार प्रतिभाताई धानोरकर(वरोरा)यांच्या शुभ हस्ते आयोजित आहे.

26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विठ्ठलराव धोटे यांच्या शुभ हस्ते झाल्यानंतर विद्यार्थी विविध देशभक्ती पर समूह नृत्य सादर करतील,सुवर्ण महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ, शशिकांत आस्वले,गिरीधर बोबडे,साईनाथ मेश्राम, रमेश पाटील, रश्मी भालेराव, मुख्याध्यापक धनराज मालेकर यांनी केले आहे.