खबरकट्टा / महाराष्ट्र :थोडक्यात -
महाराष्ट्रात 22 नवे जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करण्याचा हा प्रस्ताव आहे. 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता.
'या' नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव-
> गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी
> जळगाव जिल्ह्यातून भुसावळ
> लातूर जिल्ह्यातून उदगीर
> बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई
> नांदेड जिल्ह्यातून किनवट
> चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर
> सातारा जिल्ह्यातून माणदेश
> पुणे जिल्ह्यातून शिवनेरी
> पालघर जिल्ह्यातून जव्हार
> रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड