खबरकट्टा / चंद्रपूर :
क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर च्या वतीने दि.26 जानेवारी 2020 रोजी शासकीय ध्वजारोहण प्रसंगी जिल्ह्याचे कॅबिनेट तथा पालकमंत्री माननीय श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते पठाणपुरा व्यायाम शाळेचे राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षक श्री भूषण संजय देशमुख यांचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्यसभेचे खासदार माननीय श्री बाळूभाऊ धानोरकर, लोकसभेचे आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल सर खेमनार ,पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अनंत बोबडे सर उपस्थित होते.
श्री भूषण संजय देशमुख हे पठाण पुरा व्यायाम शाळेत मागील 10 वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून पॉवरलिफ्टिंग या खेळात पॉवरलिफ्टिंग खेळाडू तसेच पॉवरलिफ्टिंग दिव्यांग खेळाडूंना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतर विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंना मार्गदर्शन केले.
तसेच श्री भूषण संजय देशमुख यांची निवड नाशिक व नागपूर येथे राज्य स्तरावर प्रशिक्षक तर राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून आग्रा, जालना, नागपूर, रायपूर व अखिल भारतीय विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरीता,गोंडवाना विद्यापीठ तर्फे विजयवाडा, चंदीगड, जालंधर, मुंबई येथे राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली होती. ,त्याचा या उल्लेखनिय कामगिरी करिता तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी करून जिल्ह्याचा मान वृद्धिवंत केल्याबद्दल श्री भूषण संजय देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2020 पॉवरलिफ्टिंग या खेळाकरीता देण्यात आला.