अवैध दारुतस्करी करणाऱ्या भरधाव गाडीची प्रवासी ऑटोला धडक :2 गंभीर जखमी : दारूतस्करांची दहशत कायम #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध दारुतस्करी करणाऱ्या भरधाव गाडीची प्रवासी ऑटोला धडक :2 गंभीर जखमी : दारूतस्करांची दहशत कायम #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वरोरा येथे वणीमार्गे अवैध दारूसाठा  घेऊन भरधाव गतीने दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली असून यामध्ये ऑटोमधील 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा शहरात दारुतस्करानी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कधी वणी मार्गे तर कधी नागपुर मार्गाने भरधाव वाहनांने दारूची तस्करी केल्या जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.वणी मार्गे अवैध दारूसाठा घेऊन भरधाव रित्या दारूची तस्करी करणाऱ्या (वर्णा कार ) क्रमांक एम.एच.31 सी.पी. 9292  या वाहनांने वरोरा वरून वणी मार्गे जात असलेल्या प्रवासी ऑटोला धडक दिली असून या धडकेत ऑटो मधील प्रवासी राजू सदाशिव रोडे वय -47 रा गोपालपूर ता.वणी जिल्हा यवतमाळ व  लक्ष्मण तुकाराम वाढई वय - 35 रा. गोपालपूर ता. वणी जिल्हा यवतमाळ हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारा करीता चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

अपघाता नंतर आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी गाडीतून एकून 24 पेट्या देशी दारू किंमत 2 लाख 30 हजार 400 रुपये , वर्णा गाडी किंमत 3 लाख 50 हजार रुपये व एक मोबाईल किंमत 5 हजार रुपये असा ऐकून 5 लाख 85 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.