सविस्तर वृत्तानुसार दिनाक 25/05/2019 रोजी नामे महेन्द्र सोनटक्के रा ब्रम्हापुरी यांचे घरी रिसेप्शन या कार्यक्रम होता कार्यक्रम संपल्यानंतर रात्री घरी पाहुणे असल्याने घराचे दार उघडे करून झोपले असता कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून पाहुण्याच्या बैग मधुन सोन्याचे दागीने एकुण 160 ग्राम , दोन मोबाईल व नगदी असा एकुण 3,80,000/-रू.था माल चोरीला गेला होता.
या तक्रारीवरून पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथे अप.क 400/19 कलम 380, भा.द.दी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर चोरीचा व गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी साहेब यांचे मार्मदर्शनाखाली गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखे कडुन करण्यात येत होता. दि. 23/01/2020 रोजी पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे व स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पो उप. नि. गदादे, स फौ पदमाकर भोयर, ना.पो,शि.प्रकाश बन्ल्की , पो,शि प्रांजल झिलपे, सतीप बगमारे, मिलींद जाभुळे हे गुन्हयासंबंधाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना गोपणीय सुत्राव्दारे माहिती मिळाली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रोहीत रमाकात अर्गेलदार रा.गांधीनगर ब्रम्हपुरी याचे कडे एक चोरीचा मोबाईल असल्याची माहीती मिळाली.
त्यास तपासले असता त्याचे जवळ सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आला. त्यावरून त्यास ताब्यात घेवुन अधिक विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्या व्यतीरीक्त ब्रम्हपुरी येथेच नोव्हेबर महीन्यात उमाकांत चामोर्शीकर याचे घरी सुदधा लग्ना दरम्यान चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयात अटक करून मा. न्यायालयातुन आरोपीचा पोलीस कोठडी रिमाड मंजुर करून आरोपी कडुन दोन्ही गुन्हयातील मिळून एकण126 ग्रॅम सोने, दोन मोबाईल असा एकुण 4,58,380/- रु. चा माल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपी हा घरफोडी चोरीच अटटल गुन्हेगार असुन त्याचे कडुन अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस निरीक्षक कोकाटे याचे मार्गदर्शनाखाली पो.उप नि. गदादे व स.फो पदमाकर भोयर व त्यांचे पथक पढीलतपास करीत आहेत.