बिग ब्रेकिंग : शिक्षकांच्याच 1 मे ते 15 जून 2020 कालावधीतील उन्हाळी सुट्ट्या रद्द ! Summer holidays for teachers canceled from May 1 to June 15, 2020! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : शिक्षकांच्याच 1 मे ते 15 जून 2020 कालावधीतील उन्हाळी सुट्ट्या रद्द ! Summer holidays for teachers canceled from May 1 to June 15, 2020!

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


देशाच्या जनगणनेसाठी मोठय़ा प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्टय़ाही रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तशा नोटिसा पाठवल्या आहेत त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून शिक्षक या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांच्याच माथी हे काम मारू नये अशी मागणी केली आहे.


2021 च्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे आदी कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी या कालावधीतील शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्टय़ांवर गदा येणार आहे. या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

प्रत्येक कामासाठी शिक्षकच का?प्रत्येक कामासाठी शिक्षकच का वापरले जातात? त्यांच्याच सुट्टय़ांवर गदा का आणली जाते? इतर कर्मचाऱ्यांकडे हे काम का सोपवले जात नाही? आम्ही जनगणना अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करू नयेत. कारण त्या कालावधीत त्यांना कुटुंबासोबत बाहेर जावे लागते तसेच बोर्डाचे पेपर तपासणीचेही काम येते. विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.अशी प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून येत आहे.