जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या स्पर्धेत "संध्या गुरनुले" यांच्या नावाला वाढते समर्थन तर विद्यमानापैकी "ब्रिजभूषण पाझारे" पुन्हा सभापती? #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या स्पर्धेत "संध्या गुरनुले" यांच्या नावाला वाढते समर्थन तर विद्यमानापैकी "ब्रिजभूषण पाझारे" पुन्हा सभापती? #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडयेत्या 4 जानेवारी 2020 ला आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सध्या सत्ताधारी भाजप, काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.  जिल्हा परिषदेच्या उर्वरित कार्यकालाकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदांची निवडणूक होणार असून त्याकरिता विशेष सभा जिल्हा कन्नमवार सभागृहात बोलाविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत भाजपचे ३६, तर काँग्रेसचे २० सदस्य आहेत. सध्या सत्ताधारी भाजपमध्ये अध्यक्ष होण्यासाठी अनेक नावांची चर्चा आहे. परंतु, मुनगंटीवार यांनाच शह देण्याची खेळी आता उघडकीस आलील्याने वेगळी चूल मांडायच्या तयारीत असलेल्या सदस्यांची गोची झाली असून.चंद्रपूर महानगरपालिकेप्रमाणेच आता जिल्हापरिषदेतही अंतिम शब्द आमदार मुनगंटीवार यांचाच चालेलं, हे निर्विवाद आहे.

अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आल्याने सत्ताधारी भाजपातील इच्छुक पुरुष सदस्यांचा हिरमोड झाल्यावर आपल्या मर्जीतील महिला सदस्यांना अध्यक्ष पदावर बसविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कमी-अधिक प्रमाणात लॉबिंग सुरु असून यातही माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार याचंच शब्द प्रमाण मानल्यास माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे पारडे जड झाले असून स्पर्धेत नितु  चौधरी, अर्चना जीवतोडे, वैष्णवी बोडलावार यांची नावे मागे पडल्याचे पक्षच्या अंतर्गत वर्तुळात चर्चेत आहे.

काही सदस्यांचा वेगळा गट बनवून मुनगंटीवारांवर दबाव निर्माण करू पाहणाऱ्या गटाची सुद्धा संध्या गुरनुले यांच्या नावावर सहमती झाली असून त्यापैकी एकाच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडू शकते.

अध्यक्ष पदाकरिता विद्यमान अध्यक्ष देवराव भोंगळे आग्रही असलेल्या सदस्या  रितू चौधरी यांना महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण सभापतिपदी पुनः ब्रिजभूषण पाझरे यांचीच वर्णी लागणार हे जवळपास निश्चित असल्याचे कळते.