चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : असे आहे वेळापत्रक #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : असे आहे वेळापत्रक #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात 


चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शनिवार दि. ४ जानेवारी, २०२० रोजी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आरक्षीत प्रवर्गानुसार सर्वसाधारण महिलेची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे. 

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून जाहिर करण्यात आला आहे. दिनांक ४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारणे, दुपारी १.०० वाजता सभेची सुरूवात, दुपारी १.०० वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी १.१५ ते १.३० वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे तर दुपारी १.३० वाजतानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेवून अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.