लाठी गावात संत श्री नारायण महाराज यांचा पुण्यतिथी पालखी सोहळा संपन्न #yawatmal #wani - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लाठी गावात संत श्री नारायण महाराज यांचा पुण्यतिथी पालखी सोहळा संपन्न #yawatmal #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी -

लाठी येथे दिनांक 25 डिसेंबर 2019 ला संत श्री नारायण महाराज यांचा पालखी सोहळा सपन्न झाला. या अद्वितीय व भव्यदिव्य आशा आयोजनार्थ समस्त गावकऱ्यांनी आहोरात्र परिश्रम केले. 


नारायण महाराज यांचा संबंध लाठी या गावाशी अतिशय जवळचा स्नेहाचा व मार्गदर्शकाचा होता. एकंदर महाराजांच्या जीवनचरित्रावर दृष्टिक्षेप टाकला असता असे लक्षात येते की नारायण महाराज हे एका ठिकाणी कुठेही राहत नसे त्यांचा संचार सर्वत्र राहायचं त्यांचा संबंध लाठी या गावशी आला त्यांचे अनेकदा वास्तव्य लाठी गावात राहल्याने लाठी गावातील गावकऱ्यामध्ये व नारायण महाराज मध्ये स्नेह संबंध राहला आहे.त्यांचातील असामन्यत्वाचा प्रत्येय वेळोवळी लाठी गावातील नागरिकांना आला त्यामुळे महाराजांविषयी नागरिकामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले.त्यामुळे गावकऱ्यांचा मानस होता की संत श्री नारायण बाबा यांचा पालखी सोहळा आयोजित करावा त्याकरिता गावातील गावकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून सोहळ्याचे आयोजन केले होते.त्यामध्ये सकाळी 9 वाजता घटस्थापना,10 वाजता रांगोळी स्पर्धा 11 वाजता पालखी सोहळा,1.30 वाजता दही हंडी कार्यक्रम आणि सायंकाळी 4 वाजता गावभोजनाचा कार्यक्रम पार पडला. 

हा संपूर्ण सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला यात विविध गावातील भजन मंडळे स्वयंस्फूर्ती ने सहभागी होती सोबत शेजारील गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.या पालखी सोहळ्यामुळे गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले व गावात एकोप्याची भावना निर्मान झाली. यापुढे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा मानस या प्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी बोलून दाखवला.