दोन दुचाकी व ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यु, तिन गंभीर जखमी ##yavtmal - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन दुचाकी व ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यु, तिन गंभीर जखमी ##yavtmal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : पांढरकवडा- 



दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातातील ईसमांच्या अंगावरुन भरधाव ट्रक गेल्याने एकाचा जागिच मृत्यु झाला असुन ईतर तिघेजण गंभीर जख्मी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील मराठवाकडी गावाजवळ २९ रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली. 


प्रविण शेणु उरवते २८ रा टेंभी असे मृतकचे नाव असुन जानबा सोमाजी आत्राम, रामा टेकाम, रामकृष्ण भिमराव धुर्वे असे जख्मींचे नाव आहे. मृतक प्रविण उरवते व रामा टेकाम हे एका दुचाकीने टेंभी येथे तर जानबा सोमाजी आत्राम व रामकृष्ण धुर्वे हे दुसर्‍या दुचाकीने सुसरी येथे जात होते. टेंभी व सुसरी गाव जवळ-जवळ असल्याने व वरील चारही जण एकमेकांच्या ओळखीचे असल्याने ते दुचाकीवर जातांना बोलत जात होते. 


अशातच हायवेवरील मराठवाकडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीचे हॅन्डल एकमेकास लागल्याने त्या दोन्ही दुचाकीसह वरील चारहीजण हायवेवर पडले. यावेळी मागुन भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक एम पी ०४ जीबी ७९३७ त्यांच्या अंगावरुन गेला. या भिषण अपघातामध्ये प्रविण उरवते हा जागिच ठार झाला असुन जानबा आत्राम, रामा टेकाम, रामकृष्ण धुर्वे हे गंभीर जख्मी झाले. जख्मीं पैकी एकाला नागपुर तर दोघांना यवतमाळ येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलीसांनी सदर ट्रक ताब्यात घेवुन चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.