ब्रेकिंग : वरोरा पंचायत समिती निवडणूक संभाव्य सभापती सह दोन भाजपा सदस्यांचे कार्यालयातून अपहरण #warora - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : वरोरा पंचायत समिती निवडणूक संभाव्य सभापती सह दोन भाजपा सदस्यांचे कार्यालयातून अपहरण #warora

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :वरोरा


वरोरा येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती साठी दिनांक १ जानेवारी रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील होणारा संभाव्य सभापती रवींद्र संभाजी धोपटे यांचे वरोरा पंचायत समिती कार्यालयातून त्यांना मारपीट करून चार अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार वरोरा पोलिस स्टेशनमध्ये धोपटे यांच्या पत्नीने दाखल केली असून पोलिसांनी मात्र गुन्हा नोंदवला नव्हता. 

वरोरा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूकीत काँग्रेसकडे दोन , शिवसेनेकडे दोन अशी चार सदस्यसंख्या मिळून महाआघाडी तयार करण्यात आली आहे. उपसभापती करिता महाआघाडी साठी दोन सदस्यांची आवश्यकता आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात रवींद्र धोपटे आले असता त्यांना सायंकाळी ५.३० वाजता चार अज्ञात व्यक्तीने पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करून धोपटे यांना धक्काबुक्की करून अपहरण केल्याचा आरोप धोपटे यांच्या पत्नीने आरोप केला आहे. 


एक जुलै १ जानेवारी रोजी होणार्‍या सभापतीची आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव असून बोर्डा गणातील रवींद्र धोपटे ही एकमेव सदस्य असल्याने त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार आहे. तसेच विद्यमान उपसभापती विजय आत्राम हे शेगाव गणातून निवडून आले असून त्यांचे सुद्धा अपहरण झाले असल्याची चर्चा असून त्यांच्या पत्नीने सुद्धा शेगांव पोलीस स्टेशन मध्ये अपहरण झाल्याची तक्रार केली असल्याचे समजते. यावरून वरोरा पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तालुक्यात चांगलेच तापले असून जिकडेतिकडे अपहरणाच्या कहाण्या तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. 

राजकीय वातावरणात एक प्रकारची दहशत निर्माण झाली असून सदर अपहरण करून राजकीय पोळी शेकल्या जात असल्याचे मत व्यक्त होत असल्याची चौफेर चर्चा तालुक्यात होत आहे. सध्या वरोरा पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे. पंचायत समितीमध्ये एकूण दहा सदस्य पैकी भाजपचे सहा सदस्य संख्या होती. त्यापैकी भाजपचे नारायण पाटील कारेकर ह्या सदस्याचा मृत्यू झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारून डॉ. झाडे विजयी झाले.

त्यामुळे भाजपची सदस्य संख्या सात वरून सहा वर आली तर काँग्रेसचे सदस्य संख्या एक करून दोनवर गेली. तसेच दोन सदस्य शिवसेनेचे असल्याने एकूण आघाडीकडे चार सदस्य संख्या झाली आहेत. सहा सदस्य संख्या भाजपकडे होती. परंतु संजय देवतळे हे विधान सभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत गेले असल्याने भाजपमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली असून व सध्या स्थितीत भारतीय जनता पक्षात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून त्याचा फायदा काँग्रेसने आपले वर्चस्व पंचायत समिती वरती कसे राहतील हा प्रयत्न सफल होतील अशी शक्यता वर्तविला जात आहे. 

काँग्रेस मध्ये उपसभापती साठी रस्सीखेच उपसभापती साठी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. झाडे व संजीवनी भोयर तर शिवसेनेकडून विकास डांगरे स्पर्धेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. तर भाजपकडून खुशाल सोमलकर, गुळघाणे स्पर्धेत असून मात्र वेळेवर कोणाच्या गळ्यात कोणत्या पक्षाचे पुष्पमाला पडतील ही वेळेच सांगेल.