सट्टाकिंग शिबू विश्वासचा सुमीत बागेसर यांच्यावर प्राणघातक हल्ला : वरोरा शहरात शिबू गँग ची वाढती दहशत #warora #gangattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सट्टाकिंग शिबू विश्वासचा सुमीत बागेसर यांच्यावर प्राणघातक हल्ला : वरोरा शहरात शिबू गँग ची वाढती दहशत #warora #gangattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

वरोरा शहराला लागूनच असलेल्या बोर्डा या गावात बाहेरील प्रांतातील शिबू विश्वास या सट्टाकिंग आणि अवैध दारू विक्रेता यांच्या गँगने बोर्डा गावात मोठी दहशत पसरवली असून पोलिसांसोबत त्यांचे आर्थिक मधुर समंध असल्याने त्यांनी गावात दादागिरी चालवलेली आहे. मागील सोमवार दिनांक 23 डिसेंबरला रात्री 9:30 वाजता अवैध धंदेवाईक शिबू विश्वास व त्याच्यासोबत असलेला पाझरे नामक व्यक्तीने बोर्डा चौक येथे सुमीत बागेसर या विद्यार्थी युवकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हमला करून गंभीर जखमी केले.शहरात अवैध दारू आणि सट्टा विक्रेत्यांची मोठी संख्या वाढली असून पोलिस त्यांचेकडून हप्ता वसुली करीत असल्याने त्यांची दादागिरी वाढली आहे मात्र यामुळे सर्वसामान्य जनतेला यापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अवैध व्यावसायिक यांच्यासोबत पोलिसांचे आर्थिक मधुर समंध असल्यानेच अवैध व्यावसाईक दादागिरी करीत आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांच्या  “सदरक्षणाय खलनिग्रहनाय”  या ब्रिदाला पोलिसांनीच हड़ताळ फासल्याचे दिसून येत आहे.

या हमल्यानंतर जखमी सुमीत याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सेवाग्राम येथे भरती करण्यात आले. जखमीच्या डोक्यावर गंभीर घाव असल्यामुळे तब्बल 27 टाके लागले आहे. त्यामुळे पोलिस स्टेशन वरोरा येथे आरोपी विरोधात केवळ कलम 324 अंतर्गत गुन्हा नोंद असला तरी पोलिसांनी आरोपीला वाचविण्यासाठी त्याला अटक केली नाही असे जखमीच्या परिवाराचा आरोप आहे.


आता या प्रकरणी आरोपी  शिबू विश्वास व त्यांच्या साथीदारांवर प्राणघातक हमला केल्या प्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा व आरोपीला बोर्डा या गावातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी जखमीचा परिवार व सामजिक कार्यकर्ते यांनी केल्याने या प्रकरणात पोलिस निरीक्षक उमेश पाटील ज्यांच्याकडे तपास आहे ते काय  करवाई करतात हे पाहणे औस्तूक्याचे आहे.