खबरकट्टा / यवतमाळ :
दारूबंदी जिल्हा असलेल्या चंद्रपुरला दररोज दिवसाढवळ्या अवैध देशी विदेशी दारू पुरवठा केल्या जात असल्याने दारूबंदी केवळ नावापुर्तीच उरली आहे.
या जिल्ह्यात वणी उपविभागातुन मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. स्थानिक रामनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री जवळच्या मामला येथील घनदाट जंगलात शोधमोहीम राबवून सुमारे १ कोटीची दारू जप्त केली होती. अवैध दारू विक्रेते वेगवेगळे फंडे वापरून दारूचा पुरवठा करताना दिसत आहे.
जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू केल्यानंतर दारूमुळे जर्जर झालेल्या कुटुंबातील महिलांना हायसे वाटले. मात्र, अल्पावधीतच त्यांचे स्वप्न भंगले. यवतमाळ जिल्ह्यातून तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा सुरू आहे. स्थानिक पोलिसांकडून अवैध दारूविक्रेत्यांशी आर्थिक हितसंबंध जपत अवैध व्यावसायिकांना अभय दिले आहे.
त्यामुळे कायद्याचा धाक राहिला नसल्याने दारूविक्रेते मस्तवाल झाले आहेत. रामनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मागील आठ दिवसांपासून शहरात प्रवेश करणार्या सर्व मागांवर जोरदार नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे दारू भरलेला ट्रक मालाच्या घनदाट जंगलामध्ये नेण्यात आला.
खबर्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ‘सर्चिंग ऑपरेशन' केले. त्यानंतर चंद्रपुर पोलीसांना अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. भालर येथील एका दारू दुकानात दिवसभर देशी दारूचे लेबल काढुन पेट्या सिलबंद करण्याचे काम दिवसरात्र केले जाते, त्यानंतर भालर, तुकम, चंद्रपुर असा मार्गक्रमण करीत थेट एका शाळेत दारू उतरविली जाते. परंतु एका पुढार्यांने पोलीसांना आदेश दिले असल्याने आपला मोबदला वाटुन घेत डोळे मिटुन राहण्यास सांगीतले.
एकट्या वणी शहरातून दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना, घुघुस, गडचांदुर, राजुरा या चार तालुक्यातील प्रत्येक गावाला दुप्पट किंमत आकारुन दारू पुरवठा केल्या जात आहे. तर वणी वरोरा मार्गावरील एका दारू दुकानातुन दररोज बाटल्यांचे लेबल काढुन पेट्या सिलबंद करून भद्रावती येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालकाशी करार करून हा व्यवसाय राजरोसपणे केल्या जात आहे. वणी येथील दारू दुकानाची जिल्हाधिकार्यांनी सखोल चौकशी लावल्यास अनेक गंभीर बाबी समोर येतील तसेच दारू पुरवठा करणार्या तस्करांचे वेळीच मुसक्या आवळल्यास दारबंदी खर्या अर्थाने होईल.