नशिब बलवत्तर म्हणून प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून पडला तरूण #trainaccident #railwaystationaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नशिब बलवत्तर म्हणून प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून पडला तरूण #trainaccident #railwaystationaccident

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : गोंदिया -


चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना पाय घसरल्याने रेल्वे रुळांमध्ये पडलेल्या युवकाचे प्राण कर्तव्यवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले आहे. ही घटना गोंदिया रेल्वे स्टेशनची असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जखमी झालेल्या तरूणाचे नाव अमन सुरेंद्र वैद्य (वय २०) असून तो चिचगड बालाघाटचा रहिवासी आहे.बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसविण्यासाठी चढला होता. अचानक ट्रेन सुरु झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला. 

तो चालत्या रेल्वे गाडीच्या आत पडत असल्याचे बघता त्या ठिकाणी आपले कर्तव्य बाजातव असलेल्या रेल्वे सुरक्षा जवान चंद्रकांत बघेल यांना दिसताच त्यांनी लगेच त्याला ओढूत बाहेर काढले. नशीब बलवत्तर होते म्हणून तरूणाचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.