व्याघ्र हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुंबियाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुढाकाराने वनविभागातर्फे 1 लाखाची तात्काळ मदत #tigerattack #forestdepartment - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्याघ्र हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुंबियाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुढाकाराने वनविभागातर्फे 1 लाखाची तात्काळ मदत #tigerattack #forestdepartment

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ( 25 डिसेंबर : 05:45PM)

आज राजुरा शहरालगत जोगपूर जंगलात झालेल्या वाघाच्या हमल्यात मंगेश कोडापे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्याच्या पच्छात पत्नी गौरी मंगेश कोडापे व दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून घरातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ध्यानात घेता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे महिपाल मडावी जिल्हामहासचिव   तालुका अध्यक्ष विनोद गेडाम       कार्याध्यक्ष, अंकुश कुडमेथे, नितिन सिडाम जिल्हा उपाध्यक्ष ,संतोश मडावी तालुका यूवा अध्यक्ष  यांनी सहकार्य न मिळाल्यास मृतकाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला असता. 



वनविभागाकडून तात्काळ मृतकाच्या कुटुंबियांना आज एक लाखाची मदत करण्यात आली असून शविच्छेदनानंतर उद्या मृतकाची पत्नी गौरी मंगेश कोडापे च्या नावे 4लाख व तिन्ही मुलांच्या नावे 10लाखाची मदत दिल्या जाईल असे सांगितले.




------------------------------------------------
राजुरा शहरालाहत वाघाचा हल्ला -इसम ठार  : महिन्याभरात तालुक्यातील चौथी घटना #tigerattack #rajura 

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -(25डिसेंबर : 01 :10PM)


राजुरा शहरातील जंगल लागून असलेल्या इंदिरा नगर (वॉर्ड -17) वस्तीच्या मागील बाजूला घरकुल बांधकामासाठी रेती आणण्यासाठी बैलगाडीने गेलेल्या मंगेश कोडापे यास वाघाने हमला चढवून ठार केल्याची घटना आज दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली असून वृत्त लिहेपर्यंत वन विभाग व पोलीस चमू घटनास्थळी दाखल व्हायची होती.