खबरकट्टा / गडचिरोली :
एटापल्लीचे तहसीलदार एस आर यादव यांचे ह्रदयविदाराच्या तीव्र धक्क्याने आज गुरुवार ला सकाळी 10:30 च्या दरम्यान अहेरी येथील रूग्णालयात ऊपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने एटापल्ली तालूक्यासह महसूल प्रशासनात शोकलहर व्याप्त आहे.
प्राप्त माहितीनुसार यादव यांना आज सकाळी 8:00 च्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविदाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब अहेरी येथील ऊपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ऊपचारादरम्यान त्यांना साधारणतः दुसरा झटका आला आला. आणि काहीही करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सुभाष रोहिदास यादव हे 31वर्षीय तरूण तहसीलदार मुळचे अहमदनगर जिल्हातील कर्जत येथील रहिवासी.ते विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे.
स्वर्गीय यादव हे सन 2014 च्या तुकडीतील नायब तहसीलदार असून तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे प्रशासकीय सेवा देऊन दिनांक 13 सप्टेंबर 2019 ला पदोन्नती ने एटापल्ली येथे तहसीलदार म्हणून रुजू, मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना प्रेमाची वागणूक, प्रशासनातील कर्तृत्व उत्तम, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनामुळे ते सर्वांचे आदरनिय होते. अशा कर्तृत्वाभिमुख दिवंगत तहसीलदार यांना महसूल संघटनेने भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केली आहे.