जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथे संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आश्रमशाळेतील अधीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून ठेवल्याच्या मृताच्या नातेवाईकांना कळताच व तशी चिट्ठीही सापडल्याने संतप्त जमावाकडुन शाळेच्या मुख्याध्यापकांना मारहाण झाली.
गावातील वातावरण काही काळ तणावपुर्ण होते. पोलीसांचा हस्तक्षेपाने जमाव शांत झाला. चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालूक्यातील पिट्टीगुडा येथिल खेमाजी नाईक आश्रम शाळेतील अधिक्षक सूभाष पवार यांनी शाळेचा आवारात गळफास घेवून आत्महत्या केली.
संस्थाचालकाचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतांचा नातेवाईकांचा आहे. आत्महत्येची घटना उघळकीस येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने शाळेचे मुख्यधापक लोपचंद राठौड यांना मारहाण केली. राठौड यांनी जमावातून स्वतची कशीबशी सूटका करित घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले होते. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पोलीसांचा हस्तक्षेपाने जमावाला शांत करण्यात आले. मुख्यधापक राठौड यांना उपचारासाठी गडचांदूर रुग्णालयात हलविल्याची माहीती आहे. उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हिवाळे पुढील तपास करित आहेत.
----------------------------------------------------------------
आश्रमशाळेतील अधिक्षकाची आत्महत्या : संस्थाचालकांचा नाहक जाच : आणखी एका शिक्षकाला मारहाण : #superitendent commits sucide #jivti
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -(25 डिसेंबर 11:30AM)
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील आश्रमशाळेच्या अधिक्षकानं शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील ही घटना असून, सुभाष पवार (४२) असं आत्महत्या करणाऱ्या अधिक्षकाचं नाव आहे.
संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप असून, तशी चिट्ठीही सापडल्याचं सांगितलं जात आहे.या संस्थेत संस्थाचालकांचे जावईच हेडमास्तर असून आणखी एका शिक्षकाला त्यांनी मारहाण केली असल्याची गावात चर्चा आहे.
सुभाष सोमला पवार हे मुळ जिवती पहाडावर वसलेल्या धोंडा अर्जुनी येथिल रहिवासी असुन खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळा पिट्टीगुडा येथे कार्यरत होते. आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच त्यांच्याकडून सतत होणार्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करित असल्याचे लिहिले आहे असे समजते.
सुभाष सोमला पवार हे मुळ जिवती पहाडावर वसलेल्या धोंडा अर्जुनी येथिल रहिवासी असुन खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळा पिट्टीगुडा येथे कार्यरत होते. आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच त्यांच्याकडून सतत होणार्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करित असल्याचे लिहिले आहे असे समजते.