खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -
जिवती तालुक्यातील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळा पिट्टिगुडा या शाळेत कार्यरत अधिक्षक एस.एस.पवार यांनी दि.२५ डिसेंबर २०१९ ला शालेय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संस्थाचालक,मुख्याध्यापक व सहाय्यक आयुक्त (विजाभज)समाजकल्याण चंद्रपूर यांची सी.आय.डी.मार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संबंधिताना तात्काळ अटक करण्यात यावी.
सदर संस्थेअतर्गत कार्यरत शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांचे मागिल दोन वर्षापासून वेतनवाढ दिलेल्या नाहीत तसेच मृत कर्मचाऱ्यांचे थकित वेतन अजुन पर्यंत अदा करण्यात आलेले नाही.या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून ही बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण (विजाभज) श्री.प्रसाद कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिले परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
तसेच विजाभज अंतर्गत झालेल्या आठ (८) कर्मचाऱ्यांचे मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण (विजाभज) यांचे दि.१ आॅक्टोंबर २०१९ चे आदेशानुसार सदर संस्थेत समायोजन करण्याचे आदेश झाले परंतु सदर संस्थेने आजतागायत एकाही शिक्षकाला रूजू करून घेतले नाही व ही संस्था अधिकार्यांच्या कृपा छत्राखाली कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे.
सदर अधिकाऱ्यांची विभागाअंतर्गत चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटना समन्वय समितीच्या वतीने दि.२७ डिंसेबर २०१९ रोज शुक्रवारला जिवती तालुक्यातील सर्व शाळा,महाविद्यालय बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केले व संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन मा.तहसिलदार मार्फत शासनाला देण्यात आले.
यावेळी श्री.नभिलाष भगत सर नामदेव ठेंगणे सर,गजानन आडे सर,हनमंतु आगलावे सर, प्रा.लक्ष्मण मंगाम,प्रा.जयंत वासाडे,शेंडे सर, हेमने सर, बादुरकर सर, खोब्रागडे सर, थोंडीपरंगे सर, गेडाम सर, इंदल आडे, प्रकाश पवार सर,नामवाड,लोखंडे तसेच आदी शिक्षक-शिक्षकत्तेर कर्मचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.