सोयाबीनचा दर पाच हजारावर ! तर सोयाबीन तेलाचे दरही वाढणार ! #soyaoil #soyabeenprice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोयाबीनचा दर पाच हजारावर ! तर सोयाबीन तेलाचे दरही वाढणार ! #soyaoil #soyabeenprice

Share This
अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली मोठी घट आणि देशासह जागतिक बाजारात वाढलेल्या मागणीमुळे सध्या सोयाबीनच्या भावात वाढ झाली असून, सोयाबीनच्या दरात वाढ होऊन सध्या 4200 रुपयांपर्यंत भाव मिळत असून, महिनाभरात हे दर 4800 ते पाच हजारावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कमी दर्जाच्या सोयाबीनला सुद्धा 2700-3000पर्यंत भाव मिळत आहे.खबरकट्टा / चंद्रपूर : शेती व्यवसाय -

जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यात आणि देशभरात सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली मोठी घट आणि देशासह जागतिक बाजारात वाढलेल्या मागणीमुळे ही दरवाढ होत असून, लवकरच सोयाबीनचे दर पाच हजारापर्यंत जाण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी वर्तविली आहे.पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने, महाराष्ट्रासह इतरही सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यातच जागतिक बाजारात पाम तेलाचा पुरवठा घटल्याने आणि तेलाचे दर वाढल्याने, देशासह जागतिक बाजारात सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होऊन सध्या 4200 रुपयांपर्यंत भाव मिळत असून, महिनाभरात हे दर 4800 ते पाच हजारावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोयाबीन हे तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे पीक असून, देशातील एकूण तेलबिया उत्पादनात 30 टक्के हिस्सा हा सोयाबीनचा आहे. परंतु, ‘सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

क्लिक करा : पेट्रोल होणार 10 रुपयांनी स्वस्त; सरकार उचलणार मोठे पाऊल

पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने, महाराष्ट्रासह इतरही सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यातच जागतिक बाजारात पाम तेलाचा पुरवठा घटल्याने आणि तेलाचे दर वाढल्याने, देशासह जागतिक बाजारात सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होऊन सध्या 4200 रुपयांपर्यंत भाव मिळत असून, महिनाभरात हे दर 4800 ते पाच हजारावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

हेही वाचा : " माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम 

सोयाबीन हे तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे पीक असून, देशातील एकूण तेलबिया उत्पादनात 30 टक्के हिस्सा हा सोयाबीनचा आहे. परंतु, ‘सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.


तर सोयाबीन तेलाचे दर वाढतील......

पामतेल आणि सोयाबीन हे एकमेकांना पूरक आहे. दोन्हींचा वापर इंधनात मिश्रणासाठी करता येतो. त्यामुळे एकाचे दर वाढल्यास दुसऱ्या तेलाचेही दर वाढतात. सध्या देशात खाद्यतेलाची आयात कमी करून रिफाईंड खाद्यतेल आयातीवरही केंद्र सरकारने निर्बंध घातल्याचे सांगण्यात येते. खाद्यतेल आयात कमी झाल्यास देशात सोयाबीन तेलाचे दर वाढतील, असे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे.गुणवत्ताही ढासळली, अतिवृष्टीमुळे केवळ सोयाबीनच्या उत्पादनातच घट झाली नसून, उत्पादनाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाली आहे. त्यामुळे डागाळलेले, मातीचे, आकाराने बारीक, तेल उत्पादन क्षमता कमी असलेले, फुटलेले, रंग बदलेले, असे गुणवत्तेतीले विविध कमतरता असणारे उत्पादन सध्या बाजारात येत आहे. उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या उत्पादनाची आवक अत्यंत कमी असून, एकूणच आवक निम्म्या प्रमाणात घटली आहे.