प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच मातोश्री वर #shivsena #prakash ambedkar #मातोश्री - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच मातोश्री वर #shivsena #prakash ambedkar #मातोश्री

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा अर्थात एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने भेटायला आलो. 26 तारखेला धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं. आमची आंदोलने शांततेतच होतात असं सांगितलं”पुढच्या बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

“नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

क्लिक करा : ब्रेकिंग : अमृता फडणवीसांविरोधात शिवसेना आक्रमक; पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
“या कायद्यामुळे मुस्लिम भरडला जाणार आहेच, शिवाय हिंदूमधील 40 टक्के जनता भरडणार आहे. भटके विमुक्त 9-12 टक्के, आलुतेदार-बलुतेदार त्या सगळ्यांकडे कागदपत्रं नाहीत. एनआरसी लागू होईल तेव्हा जन्म कधी झाला याची नोंद नाही. त्यामुळे अशा लोकांना फटका बसेल” असं आंबेडकर म्हणाले.

आमचा मोर्चा नाही, तर धरणं आंदोलन आहे. दादरम्ध्ये 26 तारखेला हे धरणं आंदोलन होईल. डिटेन्शन कॅम्प आहेत, त्याबाबत एक समिती बनवून सविस्तर माहिती द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आंबेडकर म्हणाले.