खबरकट्टा / चंद्रपूर :
कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक स्वेच्छा निवृत्तीचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर झालेला नसतांना चक्क दोन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उजेडात आला आहे. या प्रकरणाने बँकेतील अनागोंदी कारभाराचा पुन्हा एक आदर्श उदाहरण सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाची संचालक शेखर धोटे यांनी तक्रार केली आहे.

कुठल्याही मंजूरीविना नियुक्ती पत्र देण्याची घाई बँकेचे अध्यक्ष यांना का झाली हा गुढ प्रश्न आता बँकेच्या वर्तुळात विचारला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत विषय क्रमांक १० मध्ये नमूद करण्यात आलेल्या टिपणीत तीन कर्मचाऱ्यांचे क्र.१ते ३ चे स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज सादर करण्यात आले होते. प्रत्यक्षात सभेच्या दिवशी पुरवणी टिपणी जोडून क्रमांक ४ व ५ चे दोन कर्मचाNयांचे व सभा सुरू असतांना वेळेवरच्या टिपणी सादर करीत आणखी सहा कर्मचाऱ्यांचे तसेच पुन्हा एकदा नव्याने टिपणी जोडून एका कर्मचाऱ्यांचे असे एकूण १२ कर्मचाऱ्यांचे स्वेच्छा निवृत्ती अर्ज सभेपुढे सादर करण्यात आले.