सातव्या वर्गातील मुलीवर शिक्षकाचा अत्याचार : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना : पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल #Sexual abuse by teacher - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सातव्या वर्गातील मुलीवर शिक्षकाचा अत्याचार : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना : पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल #Sexual abuse by teacher

Share This

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील एका विद्यालयात ७ व्या वर्गात शिकणार्‍या १३ वर्षीय मुलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याने त्या शिक्षकावर पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून सिन्देवाही पोलीसांनी अटक केली आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून अत्याचार करणार्‍या आरोपी शिक्षकाचे नाव विनोद चंबुलवार ४५ वर्ष असे आहे. नवरगाव येथील शाळेत शिकणार्‍या ७ व्या वर्गातील मुलींची सहल ( डब्बा पार्टी )२२ डिसेंबर ला दुपारी दीड वाजता गावाजवळील मिनघरी शिवमंदीर टेकडीवर आरोपी वर्ग शिक्षकाने नेली. सदर अत्याचार ग्रस्त मुलीचा विरोध असतांना तिला अधिक आग्रह करुन तु आलीस नाही तर सहल रद्द होईल. असे सांगून सहलीला येण्यास प्रवृत्त केले.

सदर सहल शिव टेकडी परिसरात गेल्यानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी असलेल्या पडक्या घरांमध्ये जबरदस्तीने अति प्रसंग त्या शिक्षकाने केल्याने सदर घटनेची माहिती मुलीने आपल्या आईवडिलांना सांगीतली. त्यामुळे दि.२७ डिसेंबरला सिंदेवाही पोलीसात अत्याचारग्रस्त मुलीने तक्रार दाखल केली.सदर तक्रारीची शहानिशा करून आरोपी शिक्षकावर ३७६,१ (ए), ३७६ (फ), ५०६ भादवी पास्को, अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

या अगोदरही याच शिक्षकाकडून असेच प्रकार झाले असल्याने त्यांचे कडून संबधीत शाळा व्यवस्थापनाने तात्काळ दखल घेवून असे प्रकार पुन्हा होणार नाही. असे लेखी लिहून घेवून त्यांना हायस्यस्कुल मधून मिड स्कुल येथे डिमोशन केल्याची चर्चा आहे. 

पुढील तपास आय.पी.एस.तारे तपास पोलीस उपविभागीय अधिकारी, मुल यांच्या मार्गदर्शनात एपीआय पुणम पाटील ब्रम्हपुरी, ठाणेदार निशीकांत रामटेके करीत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍या शिक्षकावर पुढे कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.