सामना : असा हा ठाकरे फडणवीस कुटुंबियांत ट्विटर सामना. . . ! #samna #अमृतफडणवीस #आदित्यथकिराय #warunsardesai - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामना : असा हा ठाकरे फडणवीस कुटुंबियांत ट्विटर सामना. . . ! #samna #अमृतफडणवीस #आदित्यथकिराय #warunsardesai

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :थोडक्यात -

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री आणि माजीमुख्यमंत्री यांचा ‘सामना’ रंगल्यानंतर आता त्यांच्या नातेवाईकांमध्ये ट्विटरवरती जोरदार ट्वीट टिकानाट्य सुरू झाले आहे.

शिवसेनेचे युवा नेता आणि विद्यमान मुख्यमंत्र्याचे मेव्हणे वरूण सरदेसाईंनी यांनी बोचरी टीका करत माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्वीटला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे युवा नेतेही असलेल्या वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून 'मराठी बिग बॉसचे ऑडिशन कुठे सुरू आहेत का? असे विचारले आहे. 

तसेच माजी झाल्यामुळे आता तुम्हाला कोणी इंडियन आयडॉल सारख्या गाण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार नसल्याचे फडणवीस यांना खिजवले आहे. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार...' अशी बोचरी टीका केली आहे.असे त्यानी ,म्हटले आहे.   

VarunSardesai ✔ @SardesaiVarun मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? 'माजी' झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल ला उभे पण करणार नाही. बाकी बिग बॉस साठी चालू देत जोरदार..   

 त्यापूर्वी श्रीमती फडणवीस यानी असे व्टिट केले होते की, 
AMRUTA FADNAVIS✔ @fadnavis_amruta Very true @Dev_Fadnavis ji ! One cannot be a ‘Thackeray’ also by just putting ‘Thackrey’ surname after his name ! One needs to be true, principled & should think for betterment of people & party members above his own family & power dynamics ! 

यावर पुन्हा सरदेसाई... @ShivSena @OfficeofUT   वरूण सरदेसाईंनी या ट्विटला उत्तर देताना बिग बॉससारख्या रिऍलिटी शोचा उल्लेख केला आहे. त्या शोमध्ये टिकून राहण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काही ना काही विधान करावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे अमृता फडणवीसांचा हा प्रयत्न असल्याचे टोला त्यानी हाणला आहे. 

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस यांना बरेच ठिकाणाहून गाण्याच्या कार्यक्रमांची निमंत्रणे येत त्यांनी त्या काळात अनेक अल्बममध्ये आणि सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. याचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.


                   
त्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी देखील ट्विट केले होते. 'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली', अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिले आहे. 
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान,  पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!' 
एवढंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी #आजच्याआनंदीबाई असा हॅशटॅग देखील त्यानी वापरला आहे.


हेही वाचा : भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित - वाचा : राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम !