खबरकट्टा / गडचिरोली : आरमोरी -
आज दि.25 डिसेंबर 2019 ला सायंकाळी 7:30 च्या दरम्यान अंतरजी जवळ अंधारात MH33 R3239 ही गाडी सीताराम गेडाम यांची असून अपघात ग्रस्त व्यक्ती चे नाव ललित गेडाम असून तो गंभीर जखमी झाला असून त्याला पोलीस स्टेशन आरमोरी येथील पोलीस पथकाने व्यक्तीला घटनास्थळावरून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ललित गेडाम दारू पिऊन चालवत होता व गाडी स्लिप होऊन खाली पडला त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.सदर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुढील तपास आरमोरी पोलीस ठाणे करीत आहेत.