राजुरा गडचांदूर मार्गावर खामोना गावाजवळील जव्हेरी पॉलिटेक्निक कॉलेज जवळ आज दिनांक 23 डिसेंबर 2019 रात्री 09:15 च्या दरम्यान युवकाने दुचाकीने पिकअप वाहनास ठोस दिल्याने भयावह अपघात झाला असून त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
युवकाचे नाव रमेश मडावी असून राहणार कारवा, चंद्रपूर व धानोली तांडा ता.कोरपना येथे आश्रम शाळेत चपराशी म्हणून कार्यरत असल्याचे कळते. तर धडक दिलेल्या पिकअप गाडीवर भोज ट्रान्सपोर्ट, राजुरा असा उल्लेख असून वृत्त लिहेपर्यंत मृतकाचे शरीर राजुरा ग्रामीण रुग्णालयात आणले जात होते.