समाजातील आर्थिक दरी दिवसेंदिवस वाढत असताना कुणाकडे खूप कपडे, बुट आणि दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत, तर कुणाकडे यापैकी काहीच नाही. हीच दरी कमी करण्यासाठी मोठा आधार ठरणारी आणि गेल्या काही काळापासून सर्वत्र चर्चेत असलेली ‘माणुसकीची भिंत’ आता मनपातर्फे तुकूम येथील दीनदयाल उपाध्याय शाळेत उभारली गेल्याने गरजूंना मदत मिळू शकणार तसेच वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेला वाव मिळणार आहे.
वस्तूंचा वापर कमी करणे (Reduce) त्याचा पुनर्वापर (Reuse) व चक्रीकरण (Recycle) या ३R तत्वांचा वापर प्रत्येक शहरात केला जावा याकरीता शासन प्रयत्नशील आहे.
3R तत्वांच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा कचरा कमी करण्यास मनपाच्या विविध उपक्रमांपैकी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे माणसाने माणसाशी माणसासम वागणे या ब्रिदवाक्याला पूर्णपणे न्याय देणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही संकल्पना राबवीत आहे. याच धर्तीवर शहराच्या अन्य रहिवासी भागांमधेही याप्रकारच्या माणूसकी च्या भिंती उभारण्याचे प्रस्तावीत असून लवकरच अंमलात आणली जाणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना आता सर्वत्रच लोकप्रिय झाली.