धक्कादायक ! मुंबई अन् पुणे हादरले #pune #mumbai - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक ! मुंबई अन् पुणे हादरले #pune #mumbai

Share This



मुंबई आणि पुण्यात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत चक्क चार शिक्षकांनीच मुलीवर अॅसिड हल्ला केल्याचा आरोप आहे. ही मुलगी इंजिनिअरिंग करत आहे. तर दुसरीकडे पुण्यात एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने युगांडाच्या या महिलेवर बलात्कार करण्यात आला.
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

लिफ्टच्या बहाण्याने पुण्यात परदेशी महिलेवर बलात्कार

एकीकडे प्रशासनाकडून महिला सुरक्षित असल्याचे दावे होत असताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटियन शहरातही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

याबद्दल २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पिडीत तरुणी रात्री १२च्या दरम्यान मुंढवा येथील हॉटेलमधून बाहेर पडली. त्यावेळी मोबाईलवरून घरी जाण्यासाठी कॅब बुक करता असताना पांढऱ्या रंगाच्या बाईकवरून एक तरुण आला. त्याने तिला लिफ्ट दिली आणि फोन करून मित्रालाही बोलावून घेतले.


त्यानंतर त्यांनी तिला बाईकवर मध्यभागी बसवून प्रवासाला सुरुवात केली. संबंधित तरुणीला संशय आल्याने तिने फोनवर तिच्या घराचे लोकेशन टाकून बघितले मात्र ते विरुद्ध दिशेने जात होते. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या विनंतीनंतर त्यांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी पुन्हा लिफ्ट दिली. रस्त्याजवळ आल्यावर तिने आजूबाजूला उभी असलेली मुले बघून ओरडण्याचा प्रयत्न केला. ते मुले त्यांच्याकडे येत असल्याचे बघून त्यापैकी बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला आणि ते तिघेही पडले. 

या अपघातात महिलेला दुखापत झाली मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. या संबंधी अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.