किशन नागरकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न तर प्रकाश पिंपळकर कलारत्न पुरस्काराने सन्मानित :महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या पावनभूमीत गौरव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

किशन नागरकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न तर प्रकाश पिंपळकर कलारत्न पुरस्काराने सन्मानित :महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या पावनभूमीत गौरव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  मान. किशनभाऊ नागरकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार तर मान. प्रकाशभाऊ पिंपळकर यांना कलारत्न पुरस्काराने पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने ११ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, कवींचे कविसंमेलन व राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन २२ डिसेंबरला पंढरपूर येथे पार पडले. आपल्या क्षेत्रात करीत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कला व साहित्यीक कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने गौरविण्यात येते. 

त्यात आपल्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान. किशनभाऊ नागरकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने तर कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान. प्रकाशभाऊ पिंपळकर यांना कलारत्न पुरस्काराने शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

या सेवाव्रतींच्या कार्याला  टीम खबरकट्टा सलाम व अभिनंदन.