ओबीसी कॉलम विरहित जनगणनेविरुद्ध राजुरात एल्गार #obc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसी कॉलम विरहित जनगणनेविरुद्ध राजुरात एल्गार #obc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा (वार्ताहर)- 


मराठा सेवा संघ, शाखा राजुरा तसेच इतर सहभागी संघटनांच्या माध्यमातून राजुरा येथे 28 डिसेंबर 2019 ला भारतातील पहिल्या ओबीसी जनगणना असहकार रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

भारत सरकारने 2021 मध्ये जनगणना उपक्रम जाहिर केला असून जनगणना फॉरमॅट मध्ये एस. सी., एस. टी., व अन्य असे तीन कॉलम ठेवले आहे मात्र ओबीसी कॉलमचा उल्लेख नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गामधील 3743 जातींना खुल्या प्रवर्गात स्पर्धा करावी लागेल. केंद्र शासनाचा हा निर्णय ओबीसीच्या संवैधानिक अधिकारा विरुद्ध असून तो रद्द करावा आणि ओबीसी कॉलम टाकून जनगणना करावी अशी मागणी करीत ओबीसी विरहित जनगणने विरुद्ध ओबीसी वर्गाने रॅली काढून रणशिंग फुकले. 


पाटी लावाच्या माध्यमातून जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजुऱ्यात 28 डिसेंबरला निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेवून स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग घेतला.

     
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या 3743 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करून भारतीय संविधानात कलम 340 घालून ओबीसी प्रवर्गातील जातींना आरक्षण लागू केले. परंतु प्रस्थापित राज्यकर्त्यांनी आपला बौद्धिक विवेक राजकीय पार्टीच्या सिद्धांताला गहाण ठेवून वागत असल्यामुळे 60 टक्के ओबीसींसाठी आरक्षण लागू करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाही. म्हणून ओबीसी प्रवर्गावर स्वातंत्र्यापासून अन्याय झाला आहे. दबाव गट बनवून शासनावर तसेच जनप्रतिनिधींवर दबाव टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे मत ओबीसी आंदोलनाचे प्रणेते बळीराज धोटे यांनी राजुरा येथे आयोजित ओबीसी जनगणना असहकार रॅलीतील सभेत केले. 

  


ओबीसी विरुद्ध षडयंत्र :
   
तत्कालीन प्रधानमंत्री वि. पी. सिंग यांनी इंग्रज राजवटीच्या 1931 च्या जनगणनेच्या सर्वेत ओबीसी समाजाची संख्या निश्चित केली. या सर्वेला आधार मानून आरक्षण 1990 मध्ये विपरीत परिस्थितीत लागू केले. राममंदिर सारखे भावनिक मुद्दे समोर करून आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. वि. पी. सिंग नरमले नाही म्हणून पाठींबा काढून सरकार पाडले होते. त्यानंतर आलेल्या कोणत्याही सरकारने पाहिजे तशी अंमलबजावणी केली नाही. 

यामुळे ओबीसी समाज शैक्षणिक व नौकरी आरक्षणासह अन्य आरक्षणापासून वंचित राहिला आहे. आता पुन्हा ओबीसी आंदोलन उभे होत आहे हे पाहून एनआरसी सारखे मुद्दे समोर आणून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे. करीता बहुजन समाजाने या षड्यंत्रापासून सावध राहून आपले आंदोलन तेज करावे आणि जनगणनेवर बहिष्कार टाकावा असे आव्हान ओबीसी आंदोलनाचे प्रचारक श्रीकांत राऊत, नागभीड, हेमंत पिपरे, चामोर्शी यांनी केले. 
   
रॅली संविधान चौक ते नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक असा दीड किलोमीटर प्रवास करीत संविधान चौक पंचायत समिती समोर शांततेत व नारेबाजी करीत पोहचली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पटांगणात सभा घेण्यात आली.सभेचे संचालन संभाजी साळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक डाखरे यांनी केले. 
     

रॅली व सभा यशस्वी करण्यासाठी दिनेश पारखी, लक्ष्मण घुगुल, संतोष रामगिरवार, लक्ष्मण तुराणकर, मधुकर डांगे, विनोद बोबडे, दिलीप गिरसावळे, ए. डी. एकडे, दिलीप ठेंगणे, ब्रिजेश जंगीतवार, विजय मोरे, दिनेश उरकुडे, मधुकर मटाले, जगदीश मल्लेवार, बाबुराव मुसळे, दत्तात्रय मोरे, कुणाल तुराणकर, दिपक मडावी, मेघा धोटे, माया धोटे, कुंदाताई जेनेकर, जयश्री रोगे, चित्रलेखा धंदरे, वंदना पारखी, मनीषा कायडींगे, कांचन तुराणकर, श्रुती मोहितकर, विना साळवे, मंदा घुगुल, सिंधू बोबडे, शालिनी बोबडे, सचिन मोरे, श्रीकांत मोरे, उत्पल गोरे, सूर्यभान अडबाले, विवेक खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर, विश्वास साळवे, रवी भोयर, बंटी तालन, गुड्डू बुटले, बाबुराव झटाले, केशव बोढे, प्रणव बोबडे, साईनाथ पिंपळशेंडे, बंटी मालेकर, अमोल राऊत, जय खोब्रागडे, महेश बोरकुटे, जगदीश पिंगे, प्रतीक कावळे, अनिकेत पारखी, आशिष करमनकर, संतोष देरकर, सुरज भंबेरे, उमेश पारखी, रामकीसन पारखी, रामकिशोर सपाट, राजू बुरडकर, विनोद गुरनुले, मनोज बोबडे, स्वप्नील शेरकी, सुनील बोबडे, संजय गोरे, मनोहर कायडींगे, विश्वास साळवे, रवी डाहूले, दिलीप कनकुलवार, राहुल धानोरकर, विशाल शेंडे, आसिफ, केतन जुनघरे, शुभम ढवस, अनंता येरने, दिनकर डोहे, अविनाश जाधव, अरुण गावत्रे, शुभम मुने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्न केले.