जिवती येथे NRC व CAA नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन #Nrc #caa - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती येथे NRC व CAA नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन #Nrc #caa

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -

नागरिकता रजिस्टर कायदा व नागरिकता संशोधन कायदा हा बहुसंख्य ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक-विमुक्त भटक्या जाती जमाती,मागासवर्गीय,समाज घटकांतील नागरिकांवर,अन्याय व अत्याचार करणारा आहे.हा कायदा म्हणजे एक प्रकारची जुल्मी राजवटच,अशा या जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी,उद्या २५ डिसेंबरला जिवती येथे बहुसंख्य समाज घटकांतील नागरीकां तर्फे,मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

NRC व CAA कायदा हा भारत देशातील मुळ रहिवासी बहुजन नागरिकांसाठी घातक असून, बहुजनांना घुसपेठी ठरवीणारा आहे.यामुळे या कायद्याचा विरोध करणे आवश्यक आहे.

जुल्मी कायद्याचा विरोध करण्यासाठी २५ डिसेंबरला  म्हणजेच येत्या बुधवारला मोर्चाचे व धरणाचेआयोजन करण्यात आले आहे.या मोर्च्यात हजारो च्या संख्येनी, बहुजन समाजातील नागरिकांनी-सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विर शेडमाके चौक पासुन मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि बिरसा मुंडा चौक येथे धरणा होणार असून तहसील कार्यालय जिवती येथे मोर्च्याचे सभेत रूपांतर होणार आहे.मोर्चा अतिशय शांततेत पार पडला जाणार आहे.या मोर्चाच्या समारोप प्रसंगी,अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.यात महेबुब अली शेख ,अजगरअली शेख जमालुद्दीन शेख ,शब्बीर जागिरदार ,लक्षमन मंगाम डाॕ.अंकुश गोतावळे, रशिद शेख अशपाक शेख ,रशिद अली ,सत्तार शेख ,गफ्फार शेख लाला शेख ,आरीफ शेख, कलीम शेख ,मुन्ना शेख ,रसुल शेख, सलीम सैय्यद ,सलीम शेख ,जबार शेख ,जबार कुरेशी हे मोर्चाचे आयोजक भारतीय मुस्लीम परिषद ता.जिवती असून,मार्गदर्शक सुध्दा करणार आहे.