क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या #murder

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे गारूडीचा खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या कुटूंबातील दारूड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना आज (ता.२९) समोर आली. 

मंगला रूपचंद राऊत (३०) रा.झरपडा असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणात आरोपी रूपचंद राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील झरपडा येथील रूपचंद राऊत याच्या कुटूंबात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. गावोगावी मुक्कामी राहून त्या ठिकाणी गारूडीचे खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असे. गेल्या आठ दिवसांपासून केशोरी येथे राऊत याचे कुटूंब मुक्कामी होते. काल (ता.२८) रात्री १२ वाजता सुमारास रूपचंद राऊत याने दारूच्या नशेत क्षुल्लक वादावरून पत्नी मंगला वर घाव घालून तिची हत्या केली. हत्येनंतर तो आपल्या मुक्कामी ठिकाणीच राहिला. सकाळी रक्ताच्या थारोड्यात आई मंगलाला पाहून मुलांनी आरडाओरड केली. आणि प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच केशोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंद राऊतला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.