खबरकट्टा / चंद्रपूर : अभिनंदन -
गेल्या दोन दशकांपासून दिव्यांग हिताय तसेच मानवतावादी उपक्रमासाठी धडपडणाऱ्या विकलांग सेवा संस्थेला अलिकडेच मुंबई येथील हेल्पिंग हॅन्ड वेलफेअर सोसायटी डोंबिवली मुंबई तर्फे राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध जेष्ठ समाज सेविका मेघा पाटकर यांचे शुभ हस्ते विकलांग सेवा संस्थेचे सचिव देवराव कोंडेकर व संचालक अशोक खाडे यांना शाल,वृक्ष,सन्मानचिन्ह व मानपत्र आणि महात्मा गांधी प्रतिमा देवून गौरविण्यात आले.

व्यासपीठावर सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर ,सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, प्रियंका मुणगेकर व संस्थाध्यक्षा प्रियंका कांबळे ,संस्थापक समीर चव्हाण उपस्थित होते.आदित्य सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात लकीर के इस तरफ ही नर्मदा बचाव फिल्म दाखविण्यात आली तसेच संस्थेचे टपाल तिकीट व आय एस ओ प्रमाणपत्राचे उदघाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विकलांग सेवा संस्थेला सेवेचा यथोचित सन्मान प्राप्त झाल्याबद्दल आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार ,डॉक्टर विकास आमटे सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.
क्लिक करा :" माणुसकीची भिंत " चंद्रपूर मनपाचा विधायकी उपक्रम !