राज्य मंत्रिमंडळ विस्तार...पाहा संभाव्य यादी! #mantrimandalvistar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्य मंत्रिमंडळ विस्तार...पाहा संभाव्य यादी! #mantrimandalvistar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं जातील यावर यापूर्वीच एकमत झाले आहे. मात्र कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत उत्सुकता आहे. ज्या गृहमंत्रिपदावरून तू तू मै मै सुरु आहे ते राष्ट्रवादीकडे जाऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आमची यादी अंतिम टप्प्यावर आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.यासोबतच धनंजय मुंडे यांच्याकडे अर्थ, जयंत पाटील यांच्याकडे पाटबंधारे, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जितेंद्र आव्हाडांकडे सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.कोणात्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं?
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार साधारणपणे मंत्रिपदाचं वाटप झाल्याचं समजतं. त्यानुसार, शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोणाची लागेल मंत्रिमंडळात वर्णी?... पाहा संभाव्य यादीशिवसेना -अनिल परब, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोडकाँग्रेस - अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे