तेलंगाणातील अपघातात चंद्रपुरातील दोघांचा मृत्यू #mancherial telangana accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तेलंगाणातील अपघातात चंद्रपुरातील दोघांचा मृत्यू #mancherial telangana accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

तेलंगणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे.

तेलंगाणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे. दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

                फोटो : तेलंगणामध्ये झालेला अपघात

अमोल आणि महेश दोघेही जेसीबी चालण्याचे काम करतात. तेलंगणातील मंचेरियाल येथे त्यांचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जेसीबीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जेसीबी उभी करून दोघेही दुरुस्तीचे काम करीत होते. त्यावेळी भरधाव येणाऱ्या कारने दोघांनाही धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अमोल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे, तर महेश देवावार याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.