चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणात कोडसा खाणी, सिमेंट उद्योग वीजनिर्मिती उद्योग तसेच इतर उद्योग आहे, परंतु स्थानिक युवकांना हेतू परस्पराने वर्षांनुवर्षे रोजगारापासून वंचित ठेवल्या जात आहे.
परिणामी जिल्यातील युवकांमधें बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. तसेच वेकोलि ने कोडासा खाणी साठी अधिग्रहित केलेल्या गावामध्ये रोजगाराचे तसेच पुनर्वसनाचे प्रश्ण अजूनही सुटलेले नाही. म्हणून वेकोलिच्या खाणी व वीजनिर्मिती केंद्राचा कोडसा आधारित प्रक्रिया उद्योगाचा शासकीय तसेच खाजगी आस्थापना मध्ये स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे. अन्यथा स्थानिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिलाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.