खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -
दारूबंदीच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारु महागली. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून कागदोपत्री गोष्टीत झाला असला जिल्हा दारूमुक्त व्हावा याकरिता कोणतीही ठोस उपायोजना नझाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उघडपणे दारु उपलब्ध असायची.
गेल्या पाच वर्षात पोलिसांनी अनेक मोठया कारवाह्या केल्या व न्यायालयाच्या आदेशाने कोट्यवधी रुपयांची दारु नष्ट केली.मात्र अवैध दारु विक्री ला बेरोजगारांनी स्वयंरोजगार बनवत दारु तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढवून आणखी गतिमान केले.परिणामतः ही दारूबंदी सपशेल फसवी ठरली.दुप्पट दाम असूनही सहज उपलब्धतेमुळे तळीरामांना याचा कोणताही फरक पडला नाही.
मात्र राज्यात आधी लोकसभा व 2महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर आदर्श आचारसहिंते चे पालन करताना पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी व छापेमारी करत जिल्ह्यात सर्वत्र चौकस भूमिका घेतल्याने एकंदरीत यवतमाळ आणि नागपूर येथून होणारी दारुतस्करी मंदावली होती.मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथून येणाऱ्या दारूपुरवठ्यावर पायबंद झाला होता.
निवडणुकीपुरते का असेना प्रशासन जास्त चौकस झाल्याने व वारंवार टीकेला सामोरे जावे लागत असल्याने आता निवडणुकीनंतरही पोलिसांनी तस्करांवर काही ठिकाणी जोर कायम ठेवला असल्याने. गेल्या काही महिन्यात झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्याकरिता दारुतस्कर चढ्या भावात दारु विकत असल्याने बंदीमुळे आधीच दुप्पट भाव असल्याने आता काही ठिकाणी तिप्पट भाववाढ झाल्याने मद्यपि शौकिनांना दारु पुन्हा महाग झाली आहे.
हेही वाचा : पेट्रोल होणार 10 रुपयांनी स्वस्त; सरकार उचलणार मोठे पाऊल
हेही वाचा : पेट्रोल होणार 10 रुपयांनी स्वस्त; सरकार उचलणार मोठे पाऊल