राज्य शासनाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. याअंतर्गत शाळांना तांदळासह अन्य साहित्याचा पुरवठा केला जाते. अनेकदा तांदळाचा दर्जा चांगला नसतो. मात्र, पर्याय नसल्याने हाच तांदूळ शिजविला जातो. कोलारी येथील वैनगंगा विद्यालयात तांदूळ पाठविण्यात आला. हा तांदूळ पाठविण्यात आला.
हा तांदूळ अळ्यायुक्त असल्याचे दिसून आले. ही बाब उजेडात येताच मुख्याध्यापकाने तो परत पाठविला. शालेय पोषण आगाराअंतर्गत शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच कोलारी येथील वैनगंगा विद्यालयात तांदळाचा साठा आला. जवळपास २४४ किलो तांदूळ आला. शाळेच्या मुख्याध्यापकाने तांदळाचा हा साठा बघितला. तेव्हा त्यातील तांदूळ कुजलेल्या स्थितीत होते. अळ्याही लागल्या होत्या.