नववर्षाच्या शुभमुहूर्तावर पंचायत समिती सभापती उपसभापतीच्या निवडणुका पार पडणार आहे . भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली जिवती पंचायत समिती आता नामाप्र महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ती जागा काँग्रेसच्या अंजना भीमराव पवार यांच्या वाट्याला गेेली असल्याने आता उप सभापती पदासाठी रस्सीखेच चालू आहे.
यामुळे उप सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे जिल्यात १ जानेवारी पंचायत समिती तर ४ जानेवारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला जाणार आहे.जिवती पंचायत समिती सभापती पद नामाप्र महिला साठी राखीव आहे. यामुळे अडीच वर्षे पुरुषा कडे असणाऱ्या सभापती पद अडीच वर्षे महिलांकडे जाणार आहे.जिवती पंचायत समिती मध्ये ४ सदस्य असून पाटण शेणगाव अंजना भीमराव पवार(कांग्रेस)शेणगाव भारी महेश देवकते(भाजपा)वनी गुडशेला सुनील मडावी(भाजपा)खडकी रायपूर अनिता गोतावळे(काँग्रेस) असे हे सदस्य आहेत.
अंजना भीमराव पवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या सदस्यां असून तालुक्यातील आरक्षण नामाप्र असून तालुक्यात एकमात्र त्या आहेत यामुळे सभापती पद यांचं निश्चिंत आहे.
परंतु उप सभापती महेश देवकते (भाजप) हे होते. अजून हे पद आपणालाच मिळावे म्हणून ते फील्डिंग लावत असून माजी उप सभापती सुग्रीव गोतावळे यांच्या अर्धांगिनी अनिता गोतावळे यांना उप सभापती पद मिळावे म्हणून ते देखील फिल्डिंग मध्येच आहेत महेश देवकते हे भाजपा चे दुसऱ्या टर्म मधील पंचायत समिती सदस्य असून आताचे अडीच वर्षे त्यांनी भोगले आहे आताही उप सभापती पद आपलालच मिळावे यासाठी ते आग्रही असून त्यांनी एका सदस्याला पळवले आहे अशी चर्चा आहे.
आमदार सुभाष धोटे हे उप सभापती पद आपल्याकडे खेचण्यासाठी पूर्ण ताकतीने उभे असून आता जिवती तालुक्यात कोणता उप सभापती बनतो याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.