हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार' - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार'

Share This
खबरकट्टा / राष्ट्रीय बातमी :

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात हैदराबाद पोलिसांनी हा एन्काऊंटर केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते.


अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात सज्जनार यांनी तपास यंत्रणांमध्येही गतीमान कामगिरी केली आहे. यापूर्वीही एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदारांना निलंबित केले आहे. सज्जनार हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तसेच, स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजी पदही त्यांनी कामकाज केलं आहे. साबराबदच्या कमिशनरपदी नियुक्ती झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, मुलं आणि महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचं सज्जनार यांनी म्हटलं होतं. 

जनगाव येथून अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून सज्जनार यांनी आपल्या आपीएस करिअरची सुरुवात केली आहे. हैदराबाद पोलिसांच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियातून तेलंगणा पोलीस आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांचं कौतुक होत आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 'दिशा' बलात्कार प्रकरणाता तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, दोषींना कडक शिक्षा ठोठावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचेही राव यांनी सांगितले होते. मात्र, हैदराबाद पोलिसांच्या या एन्काऊंटरमुळे 8 दिवसांतच याप्रकरणाचा निकाल लागला.