खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (३० डिसेंबर) विस्तार होत आहे. तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे गृहखातं कुणाकडे असेल याबाबतही चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही या प्रश्नाचं गुढ कायम ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती पार पडली. त्यानंतर बोलताना पाटील म्हणाले, “गृहखातं कुणाकडे असेल हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच ते कळेल”