सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड, शाळेत विद्यार्थ्यीनींसाठी मासिक पाळी व त्या विषयीचे मार्गदर्शन #guidance on menstrual health and hygiene - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड, शाळेत विद्यार्थ्यीनींसाठी मासिक पाळी व त्या विषयीचे मार्गदर्शन #guidance on menstrual health and hygiene

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -

नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिर शाळेत वर्ग ५ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनींसाठी मासिकपाळी व त्याचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.


या प्रसंगी सहा. शिक्षिका किरण वाडिकर मँडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर सहा.शिक्षिका आशा राजुरकर मँडम यांनी मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करायचे व या विषयी समज गैरसमज व या सर्वांमुळे स्त्रियांना होणारा त्रास,त्या काळा मध्ये घ्यावयाची स्वच्छता , मासिक पाळी विषयी चे पुर्वग्रह याविषयी आपल्या मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. 

मासिक पाळी पहिल्यांदाच येतांना मनात येणारी भिती व गैरसमज यासाठी या मार्गदर्शनाची आवश्कता असल्याचे प्रतिपादन राजुरकर मॅडम यांनी केले.

          
यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातुन आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले .याप्रसंगी सहा. शिक्षिका कावळे मँडम, रिता मँडम तसेच विद्यार्थ्यांनीची बहुसंख्येने उपस्थिती होती.संस्थाध्यक्ष संजय गजपुरे व मुख्याध्यापक गोकुल पानसे तसेच पालकवृदांनी या आयोजनाबद्दल कौतुक केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला.